संपत्तीच्या बाबतीत मुकेश अंबानींना मागे टाकत अदानी बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती


नवी दिल्ली – १०० बिलियन अमेरिकन डॉलर्स संपत्ती असणाऱ्या व्यक्तींच्या यादीत अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांचा समावेश झाला आहे. यांनी संपत्तीच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना अदानींनी मागे टाकले असून ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ही माहिती ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या आकेडवारीतून समोर आली आहे. सध्या ‘स्पेस एक्स’ आणि इलेक्ट्रीक कार तयार करण्याऱ्या ‘टेस्ला’ कंपनीचे सर्वोसर्वा एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानी अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोस तर तिसऱ्या स्थानी बर्नार्ड आरनॉल्ट तिसऱ्या स्थानी आहेत.

२४ बिलियन अमेरिकन डॉलर्सने अदानी यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली असून ते जगातील सर्वाधिक संपत्ती कमवणारे व्यक्ती ठरले आहेत. त्यांची संपत्ती मागील वर्षभरापासून प्रत्येक आठवड्याला सहा हजार कोटींनी वाढत आहे. सध्या अदानी हे एकूण संपत्तीच्या यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १० व्या स्थानी आहेत. या यादीमध्ये अंबानी हे ११ व्या स्थानी आहेत. अव्वल दहामध्ये त्यांनी ऑक्टोबर महिन्यात स्थान मिळवले होते. पण सध्या त्यांच्या स्थानामध्ये थोडी घसरण झाली आहे. ९९ बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी त्यांची एकूण संपत्ती आहे. या यादीत फेसबुकला मार्क झुकरबर्ग हा १२ व्या स्थानी आहे.

अदानी समूहाच्या शेअर्सची किंमत मागील दोन वर्षांमध्ये ६०० टक्क्यांनी वाढली आहे. दरम्यान अब्जाधीशांच्या यादीमध्ये एकूण २१५ भारतीय आहेत, जे देशात वास्तव्यास आहेत. जगभरातील मूळचे भारतीय असणाऱ्या अब्जाधीशांची संख्या गृहित धरल्यास अब्जाधीश भारतीयांची एकूण संख्या २४९ एवढी आहे.