या देशातील सैनिकांकडे सर्वाधिक खतरनाक मशीनगन्स

जगातील सर्व देश आपापल्या लष्कराला सशक्त ठेवण्यासाठी शक्य ते सर्व मार्ग अवलंबत असतात. सेनेसाठी खास बजेट असते आणि त्यातून अत्याधुनिक शस्त्रे, इतर आवश्यक सुविधा सोयी सैनिकांना पुरविल्या जातात. अमेरिका, चीन, फ्रांस, रशिया या देशांच्या आर्मी जगप्रसिद्ध मानल्या जातात पण सर्वाधिक पॉवरफुल मशीनगन मात्र यापैकी कुठल्याही देशाच्या सैनिकांकडे नाहीत. तर या बाबत ब्रिटन जगात नंबर एकवर आहे.

ब्रिटनच्या रॉयल नेव्ही स्पेशल फोर्स युनिट, (यालाच स्पेशल बोट सर्विस म्हटले जाते ) आणि ब्रिटीश आर्मी स्पेशल फोर्स युनिट म्हणजे स्पेशल एअर सर्विस या विभागाच्या सैनिकांना जगातील सर्वाधिक वेगवान आणि पॉवरफुल मशीनगन्स दिल्या गेल्या आहेत. डेली स्टारच्या बातमीनुसार या दोन्ही फोर्स मधील सैनिकांना सर्वाधिक खतरनाक माशिन्गंस एक्सएम ५५६ पुरविल्या गेल्या आहेत. यापूर्वी इतक्या पॉवरफुल मशीनगन्स तयारच झाल्या नव्हत्या असाही दावा केला जात आहे.

ब्रिटनच्या एसएएस आणि एसबीएस सैनिकांना दिल्या गेलेल्या एक्सएम ५५६ माधीनगन्स मधून एक मिनिटात ८००० राउंड फायर करता येतात. हे गॅटलिंग गनचे छोटे व्हर्जन आहे आणि वाहनांवर त्या लावता येतात. चकमकी, जवळून कराव्या लागणाऱ्या युद्धात त्या फार उपयुक्त ठरतात. सैनिक या गन्सना ‘विडो मेकर’ या नावाने संबोधतात. एकाच वेळी या मशीनगन्स मधून गोळ्यांचा पाउस पाडता येतो आणि गनचा आवाज दहशत निर्माण करतो. एका सेकंदात यातून १३०० गोळ्या झाडल्या जातात. इतकी क्षमता सध्या तरी कुठल्याच मशीनगन मध्ये नाही.

या मशीनगन सहा बॅरलच्या असून त्यांना २४ वोल्ट डीसी पॉवर सोर्सची गरज असते. २ फुट लांबीच्या या गन्स ५ किलो वजनाच्या आहेत.