इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी देरवेळेस काहीना काही तरी नवीन फिटर आणत असते. पण यावेळी कंपनीने खासकरून आपल्या महिला वापरकर्त्यांना लक्षात घेऊन एक अतिशय खास फीचर सादर करण्याची घोषणा केली आहे. भारतीय महिलांसाठी AI आधारित चॅटबॉट कंपनीने आणला आहे, ज्याला ‘बोल बहन’ असे नाव देण्यात आले आहे. कंपनीने यासाठी ‘नॉन-प्रॉफिट गर्ल इफेक्ट’ सोबत भागीदारी केली आहे.
व्हॉट्सअॅपचे ‘Bol Behen’ चॅटबॉट करणार तरुण मुलींची मदत
व्हॉट्सअॅपने नॉन-प्रॉफिट गर्ल इफेक्टसोबत भागीदारी केल्यानंतर, भारतीय महिला आणि तरुण मुलींसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित चॅटबॉट ‘बोल बहन’ लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. महिलांना या चॅटबॉटवर आरोग्यविषयक माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर या चॅट फॉरमॅटची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, महिलांना आरोग्य, लैंगिकता आणि नातेसंबंध या विषयांची माहिती येथे मिळू शकेल. हिंग्लिश म्हणजेच इंग्रजी आणि हिंदी भाषेच्या मिश्रणाने हा चॅटबॉट तयार करण्यात आला आहे.
बोल बहन चॅटबॉट वापरून तुम्हालाही कोणतीही माहिती मिळवायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला +९१-७३०४४९६६०१ हा नंबर सेव्ह करावा लागेल. त्यानंतर या नंबरवर Hi चा संदेश पाठवावा लागेल. विशेषत: भारतातील हिंदी पट्ट्यातील किशोरवयीन मुली आणि महिलांना लक्षात घेऊन हा चॅटबॉट सादर करण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. जे सहसा लोडेड एंड स्मार्टफोन वापरतात. याद्वारे महिलांना अनेक महत्त्वाची माहिती मिळू शकणार आहे.
व्हॉट्सअॅपवर बोल बहन चॅटबॉट मर्यादित वापरकर्त्यांसाठी सादर करण्यात आला आहे आणि ते सध्या फक्त बीटा आवृत्तीवर वापरले जाऊ शकते. चांगली गोष्ट म्हणजे बोल बहन चॅटबॉट मोबाईल आणि वेब दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध असेल. ते वापरण्यासाठी चॅटबॉटचा नंबर सेव्ह केल्यानंतर त्या नंबरवर हायचा मेसेज पाठवावा लागेल. ज्यानंतर उत्तर येताच तुम्हाला महिलांशी संबंधित कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळू शकते.