चीनच्या सर्व ३१ प्रांतात पसरला करोना

दोन वर्षापूर्वीच करोना उद्रेक सुरु झाला असला आणि त्याची सुरवात चीनच्या वूहान पासून झाली असली तरी सर्व जग पादाक्रांत केल्यावर पुन्हा एकदा करोनाने चीन व्यापला आहे. विशेष म्हणजे या वेळी चीनच्या सर्व ३१ प्रांतात करोना प्रादुर्भाव झाला आहे. चीनची झिरो कोविड पॉलिसी निरुपयोगी ठरल्याचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. करोनाच्या नव्या ओमिक्रोन व्हेरीयंटमुळे चीन मध्ये संक्रमित झालेल्यांची संख्या ६२ हजारांवर गेली आहे आणि शांघाई समवेत अन्य पाच शहरात कडक लॉकडाऊन लावला लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चीनच्या सरकारी रुग्णालयात नवीन करोना रुग्ण सामावून घेण्यासाठी जागाच उरलेली नाही. पहिल्या लाटेच्या वेळी सुद्धा चीन मध्ये कडक लॉकडाऊन होता आणि एक केस सापडली तरी पूर्ण शहर बंद केले जात होते पण त्याचा विपरीत परिणाम चिकित्सा व्यवस्थेवर झाल्याचे आता दिसून येत आहे. शांघाई पुढील शुक्रवार पर्यंत पूर्ण बंद केले गेले आहे मात्र बँकेसारख्या आवश्यक सुविधा सुरु ठेवण्यासाठी संबंधित कर्मचारी बँकमध्येच मुक्काम करून राहिल्याचे समजते.

चीनची गणना सर्वाधिक करोना लसीकरण झालेल्या देशात होते. येथे ८८ टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला गेला आहे मात्र ६० वर्षांवरील ५२ टक्के नागरिकांनाच डबल डोस मिळाला आहे असे आकडेवारी सांगते.