आता आयपीएल मिडिया हक्कावरून अंबानी- बेजोस आमनेसामने
मुकेश अंबानी यांच्या रिलायंस रीटेल्स आणि जेफ बेजोस यांची अमेझोन मध्ये फ्युचर ग्रुपवरून झालेली लढाई ताजी असतानाचा पुन्हा एकदा हे दोघे बलाढ्य उद्योजक एकमेकांच्या आमने सामने खडे होत आहेत. यावेळी या लढाई साठी निमित्त ठरणार आहेत आयपीएल २०२३-२७ साठी चे मिडिया हक्क. बीसीसीआयने या कालावधीतील मिडिया हक्कासाठी निविदा काढल्या आहेत. सध्या हे हक्क हॉट स्टारकडे असून त्यांची मुदत आता संपते आहे.
या मिडिया हक्कांसाठीच्या या वेळचे दिशानिर्देश पाहिले, तर बोली आणि तणाव वाढवा या दृष्टीनेच डिझाईन केले गेले आहेत असे दिसते. कारण प्रथमच टीव्ही प्रसारण आणि ऑनलाईन स्ट्रीमिंग अधिकार वेगळे ठेवले गेले आहेत. अमेझोन डॉट कॉम इंक व त्यांच्या प्राईम व्हिडीओ सेवेसाठी यामुळे दार उघडले जाणार असले तरी मुकेश अंबानी यांच्या रिलायंस इंडस्ट्रीजने हे अधिकार मिळविण्याचा निर्धार केला आहे असे सांगितले जात आहे. यासाठी ई निलामी १२ जून पासून सुरु होणार आहे. त्यासाठी १० मे पर्यंत नॉन रीफंडेबल २५ लाख रुपये शिवाय जीएसटी जमा करायचा आहे.
स्टार इंडियाकडून डिस्नेने सध्याचे अधिकार खरेदी केले होते. २००८-१७ या काळात हे अधिकार सोनीकडे होते तर २०१५-१७ या कालावधीत ते हॉटस्टार कडे होते. डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसारण अधिकार दिले गेले होते. ब्लुमबर्गच्या रिपोर्ट नुसार या प्रतिष्ठेच्या लिलावात रिलायंस, अमेझोन सह अन्य कंपन्या पूर्ण ताकदीनिशी उतरतील आणि ही बोली ५० हजार कोटींवर जाऊ शकेल. भारतात क्रिकेटचे लाइव स्ट्रीमिंग वेगाने लोकप्रिय होत आहे त्यामुळे या माध्यमातून १.४ अब्ज लोकांपर्यंत सहज पोहोचण्याचा मार्ग लिलाव जिंकणाऱ्या कंपनीला मिळणार आहे.