झेलेन्स्कीना शांती वार्ता मध्ये वाटतेय विषप्रयोगाची भीती

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरु होऊन ३५ दिवस लोटले असले तरी त्यावर अजून काहीही तोडगा निघालेला नाही. यासाठी जगभरातील अनेक देश शांती वार्ता सुरु व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत. तुर्कस्तान मधील इस्तंबूल मध्ये युक्रेनी आणि रशियन यांच्यात शांती वार्ता सुरु होत असतानाचा युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांना मात्र आपल्या सहकाऱ्यांवर विषप्रयोग होऊ शकतो या भीतीने ग्रासले आहे.

शांती वार्तेसाठी जाणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांना झेलेन्स्की यांनी खास सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये तेथे काहीही खाऊ पिऊ नका, कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका असे सांगितले गेले आहे. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या संदर्भात एक पत्रकच जारी केले आहे.

झेलेन्स्की यांना विषप्रयोग होण्याची भीती वाटण्यामागे काही कारणे आहेत. कारण गेल्या वेळी जेव्हा अशी बैठक झाली त्यानंतर अनेक प्रतिनिधी आजारी पडले होते. रशियन अब्जाधीश व चेल्सिया फुटबॉल क्लबचे मालक रोमन अब्रमिवीच यांचीही तब्येत बिघडली होती. अर्थात रशियाने हे सर्व दावे फेटाळले आहेत पण तरीही युक्रेन कोणताही धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नाही. रशियाने कीव भोवतीची घेराबंदी उठवण्याची आणि राजधानी बाहेरची सेना हटविण्याची तयारी दाखविली आहे मात्र झेलेन्स्की यांनी त्यावर अजिबात विश्वास ठेवलेला नाही.