हा किडा बनवेल करोडपती

पाळीव प्राणी अनेक लोक पाळतात, काही जणांना नाग, साप असले प्राणी पाळायला आवडते. परदेशात पांढरे उंदीर, अजगर असले प्राणी पाळणारे लोक सुद्धा आहेत. पण कुणी किडे पाळत असेल यावर आपण चटकन विश्वास ठेवणार नाही. अर्थात चीन मध्ये झुरळे पाळली जातात. असा एक किडा आहे, जो तुम्हाला सापडला तर तुम्ही अक्षरशः करोडपती बनू शकता. या किड्याला स्टॅग बीटल असे म्हटले जाते. हा जगातला दुर्लभ प्रजातीचा जीव दोन ते ३ इंचाचा असतो. त्याला ओळखणे सोपे आहे. गडड निळ्या काळ्या डोक्याच्या या किड्याला खेकड्यासारख्या डोक्यावर दोन नांग्या असतात.

पृथ्वीवर असलेल्या अजब प्रजाती मध्ये या किड्याचा समावेश होतो. फारच कमी लोकांना या किड्याच्या किमतीची कल्पना असते. तश्या या किड्याच्या सुमारे १२०० जाती आहेत पण त्या सर्व किमती नाहीत. पण काही जातींना मात्र १ कोटी पर्यंत किंमत मिळते. या किड्याचा वापर विविध औषधी मध्ये केला जातो त्यामुळे तो किंमती आहे असे सांगितले जाते.

पूर्ण वाढ झालेले हे किडे काही आठवडे जगतात. अंडी ते पूर्ण वाढ असे या किड्याचे जीवनचक्र सुमारे सात वर्षाचे असते. हे किडे थंड जागी राहू शकत नाहीत. त्यामुळे ते कुजलेली झाडाची पणे, शेण अश्या दमट उष्ण जागी वाढतात. या किड्याच्या अळ्या कुजलेल्या झाडांच्या खोडावर वाढतात. हे किडे प्रामुख्याने जमिनीखाली राहतात त्यामुळे फारसे दिसत नाहीत. पण असा किडा जर सापडला तर तुमचे नशीब उजळले म्हणायला हरकत नाही. एका जपानी माणसाने हे किडे पाळले होते असेही सांगतात. त्याला एका किड्यासाठी ६५ लाखाची रक्कम मिळाली होती.