दरवेळी लिलावात मोठी रक्कम मिळूनही आयपीएल मधून बाहेर होतो हा खेळाडू

आयपीएल २०२२ ची सुरवात झाली आहे आणि सुरवातीलाच पहिल्या तीन सामन्यात अटीतटी झालेली दिसून आली आहे. जगभरातील क्रिकेटपटू आयपीएल खेळण्यास उत्सुक असतात आणि मेगा ऑक्शन मध्ये सहभागी होतात पण अनेकांना कुणी खरेदीदार मिळत नाही. एक विदेशी खेळाडू मात्र दर आयपीएल मध्ये मोठी रक्कम मिळवतो पण काही ना काही करणारे आयपीएल मधून बाहेर होतो.

या खेळाडूच्या खरेदीसाठी आयपीएल फ्रान्चाईजी मध्ये अगदी युद्ध होते म्हटले तरी गैर ठरणार नाही. पण हा बाबाजी मात्र आयपीएल साठी फारसा राजी नसतो. हा खेळाडू आहे ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध ऑलराउंडर मिचेल मार्श. यंदाही त्याला लिलावात साडे सहा कोटी मोजून दिल्ली टीम ने खरेदी केले आहे पण या वर्षी सुद्धा तो आयपीएल मधून बाहेर होण्याची शक्यता वाढली आहे. २०२२ स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच मार्श जखमी झाला आहे. पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलिया टीम चा मार्श हिस्सा आहे. पण पाकिस्तान मध्ये वन डे आणि टी २० सुरु होण्यापूर्वीच तो जखमी झाल्याने खेळू शकलेला नाही.

दिल्ली कॅपिटलसाठी तो महत्वाचा खेळाडू आहे पण आता तो जखमी झाल्याने खेळणार का नाही याबद्दल शंका आहे. मार्श यापूर्वी २१ आयपीएल सामने खेळला आहे आणि त्याने २२५ धावा व २० विकेट काढल्या आहेत. २०२१ पूर्वी मार्शने त्याला दीर्घ काळ बायोबबल मध्ये रहाणे शक्य नसल्याचे सांगून आयपीएल खेळण्यास नकार दिला होता. आयपीएल बाहेर जाण्याची मार्शची ही पहिली वेळ नाही. २०२० मध्ये सनरायझर्स हैद्राबाद कडून खेळताना तो जखमी झाल्याने पूर्ण लीग बाहेर राहिला होता.