आयपीएल मधील आरसीबीची मिस्ट्री गर्ल पुन्हा व्हायरल
आयपीएल या टी २० लीग मध्ये दरवेळी अनेक चमत्कार घडत असतात. खेळाडू अशी अनेक विविध रेकॉर्ड बनवितात ज्याची कुणी कल्पना केलेली नसते. आयपीएल स्पर्धे मध्ये यापूर्वीही अनेकदा अजिबात प्रसिद्ध नसलेल्या काही तरुणी मिस्ट्री गर्ल म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. काही वर्षापूर्वी म्हणजे २०१९ मध्ये रॉयल चॅलेंजर बंगलोरला सपोर्ट करणारी अशीच एक मिस्ट्री गर्ल प्रसिद्धीच्या झोतात आली होती आणि आज पुन्हा एकदा तिचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. विविध पोझ मधील तिच्या फोटोनी त्यावेळी सुद्धा सोशल मिडीयावर धमाल केली होती.
या मुलीची ओळख पटली आहे. दीपिका घोष नावाची ही सुंदरी २०१९ आयपीएल मध्ये हैद्राबाद विरुद्ध बंगलोर सामन्यात बंगलोरची सपोर्टर होती आणि तिच्या फोटोमुळे ती रातोरात स्टार बनली होती. आजही दीपिकाचे अनेक फॉलोअर्स आहेत. तिच्या ब्ल्यू व्हाईट कॉम्बीनेशन मधील डीपनेक मोनोकीनोने त्यावेळी खूपच धमाल माजविली होती. दीपिका मॉडेल आणि डान्सर कोरियोग्राफर आहे. तिचे व्हिडीओ चाहत्यांना आवडतात. इन्स्टाग्रामवर तिचे ३ लाख १६ हजार फॉलोअर्स आहेत. इंटरनेटवर तिचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर पाहिले जातात.