बायडेन यांची पोलंड मध्ये नाटो सैनिकांबरोबर पिझा पार्टी
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना थेट आव्हान दिले आहे. युद्ध सुरु असलेल्या युक्रेनच्या सीमेवरील पोलंड मध्ये सीमेपासून ८० किमी अंतरावर असलेल्या रेजझोव येथे बायडेन पोहोचले असून त्यांनी तेथे तैनात असलेल्या नाटोच्या सैनिकांबरोबर पिझ्झा पार्टी करून सेल्फी घेतल्या आहेत. यावेळी त्यांनी पुतीन यांचा उल्लेख युद्ध गुन्हेगार असा केला. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच अमेरिकन अध्यक्ष युद्धग्रस्त देशाचा दौरा करत आहेत असे सांगितले जाते.
पोलंड मध्ये २० लाख युक्रेनियन नागरीकानी आश्रय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलीवान म्हणाले, बायडेन यांनी शनिवारी एक भाषण दिले आणि पोलंडच्या राष्ट्रपती आंद्रेदाज डूडा यांची भेट घेऊन युक्रेन शरणार्थी यांच्या संदर्भात चर्चा केली. अमेरीकेचे मानवतावादी स्वयंसेवक येथे भेट देत असल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षा कारणास्तव युक्रेनला भेट देता येत नाही या बद्दल बायडेन यांनी खेद व्यक्त केला.