आरआरआर मधील या ब्रिटीश अभिनेत्रीची होतेय वाहवा

एसएस राज्मौली दिग्दर्शित आरआरआर चित्रपट २५ मार्च ला रिलीज झाला आणि त्याला प्रेक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळू लागल्या आहेत. बाहुबलीइतका प्रतिसाद या चित्रपटाला ओपनिंग मध्ये मिळालेला नसला तरी या चित्रपटात ‘सरप्राईज पॅकेज’ ठरलेली ब्रिटीश अभिनेत्री ओलीविया मॉरीस मात्र प्रेक्षकांना एकदम पसंत पडली आहे. आरआरआर मधील प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाचे कौतुक होते आहे. रामचरण, ज्युनिअर एनटीआर यांच्याकडून प्रेक्षकाच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत पण चित्रपट जाहिरातीत फारशी चर्चा न झालेली ब्रिटीश अभिनेत्री ओलीविया हिने अनपेक्षित पणे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

ओलीविया यात ज्युनिअर एनटीआर बरोबर महत्वाच्या भूमिकेत असून तिने बड्या पडद्यावर प्रथमच काम केले असल्याचे सांगितले जाते. २५ वर्षीय ओलीवियाने या चित्रपटात जेनिफरची भूमिका साकारली आहे. ती मॉडेल म्हणूनही काम करते. अतिशय सुंदर दिसणाऱ्या ओलीवियाने रॉयल वेल्श कॉलेज ऑफ म्युझिक अँड ड्रामा मधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. आरआरआर मुळे तिच्या करियरला नवी दिशा मिळेल असे म्हटले जात आहे. यापूर्वी तिने २०१७ मध्ये मॅकबेथ अॅडाप्टेशन सह करियरची सुरवात केली होती.