अॅडटेक बायजू’ज बनली फिफा वर्ल्ड कप स्पॉन्सर करणारी पहिली भारतीय कंपनी

अॅडटेक प्लॅटफॉर्म बायजू’जने एक मोठे यश स्वतःचा नावावर नोंदविले आहे. बायजू रवीन्द्रन यांची ही कंपनी फिफा वर्ल्ड कप २०२२ची अधिकृत स्पॉन्सरर बनली असून हे यश मिळविणारी पहिली भारतीय कंपनी आहे. फिफा वर्ल्ड कप २०२२,नोव्हेंबर डिसेंबर २०२२ मध्ये कतार येथे होणार आहे. २९ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या या स्पर्धतील अंतिम सामना १८ डिसेंबरला होणार आहे. फिफा फुटबॉल वर्ल्ड कपशी जोडली गेलेली बायजू पहिली भारतीय कंपनी आहेच पण ही स्पर्धा पूर्ण जगभर स्पॉन्सर करणारा हा पहिलाच अॅडटेक ब्रांड बनला आहे.

या स्पॉन्सरशिप मुळे बायजूला फिफा वर्ल्ड कपचे लोगो, बॅज, संपत्ती पर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. कंपनी फिफाचे युनिक प्रमोशन करणे आणि जगभरातील फुटबॉल चाहत्यांना वितरण करण्यास सक्षम आहेच. भागीदारीतील हिस्सा म्हणून युवा चाहत्यांना शैक्षणिक सामग्रीचा पुरवठा कंपनी करू शकणार आहे. या स्पर्धेत जगभरातील ३२ देश सहभागी होत आहेत. बायजूने नुकतेच ८० कोटी डॉलर्स म्हणजे ६ हजार कोटी रुपये फंडिंग मिळविले आहे. त्यात रवीन्द्रन यांनीच स्वतःचे ४० कोटी डॉलर्स दिले आहेत. या मुळे रवीन्द्रन यांचा कंपनीतील हिस्सा २५ टक्के झाला आहे. नवीन फंडिंग मुळे कंपनीचे मूल्य २२ अब्ज डॉलर्सवर गेले असून जगातील सर्वाधिक मुल्यांकन झालेली अॅडटेक कंपनी बनण्यात बायजू यशस्वी झाली आहे.

बायजू आगामी ९ -१२ महिन्यात स्वतःचा आयपीओ आणणार असल्याचे सांगितले जात आहे.