हिलरी क्लिंटन यांना करोना

अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी, हिलरी क्लिंटन यांची करोना चाचणी पॉझीटिव्ह आली असल्याचे त्यांनी ट्वीट केले आहे. ७४ वर्षीय हिलरी लिहितात,’ मला करोनाची किरकोळ लक्षणे दिसत आहेत पण माझी तब्येत ठीक आहे. करोना चाचणी पॉझीटिव्ह आली आहे पण बिल क्लिंटन यांची करोना चाचणी निगेटिव्ह आहे. तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून आम्ही विलगीकरणात आहोत’

हिलरी यांनी करोना झाल्याचे सांगतानाच ‘ या गंभीर आजाराविरूढ आपल्याला करोना लस सुरक्षा देत आहे याबद्दल आभार मानले आहेत. त्या लिहितात, करोना लसीकरण करून घ्या, ज्यांना आवश्यक आहे त्यांनी बुस्टर डोस घ्या.’ निगेटिव्ह रिपोर्ट येईपर्यंत घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे गेल्याचा आठवड्यात माजी अध्यक्ष बराक ओबामा यानाही करोना संसर्ग झाला होता आणि व्हाईट हाउसच्या प्रेस सचिव जेन माली यांनी त्यांना दुसर्यावेळी कारोना झाल्यामुळे बायडेन यांच्याबरोबरच दौरा रद्द केल्याचे ट्वीट  केले आहे.