एमडीएच मसालेचा मोठा हिस्सा युनीलिव्हर खरेदी करणार
मसाले जगतातील बादशहा अशी ओळख असलेले दिवंगत धर्मपाल गुलाटी यांची एमडीएच मसाला कंपनी विक्रीच्या मार्गावर असल्याचे समजते. एका रिपोर्ट नुसार हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपनीतील मोठा हिस्सा खरेदी करत असून त्यासाठी १० ते १५ हजार कोटी मोजले जातील अशी अपेक्षा आहे. मंगळवारी या संदर्भात झालेल्या कराराची माहिती फुटताच हिंदुस्थान लिव्हरच्या शेअर मध्ये वेगाने वाढ होऊ लागल्याचे चित्र होते.
रिपोर्ट नुसार एमडीएच मसाले म्हणजे ‘महाशियान दी हट्टी’ देशात मसाले बाजारातील प्रचंड मोठा हिस्सा व्यापलेली कंपनी असून २०२५ पर्यंत या कंपनीची उलाढाल ५० हजार कोटींवर जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. २७ मार्च १९२३ रोजी पाकिस्तानच्या सियालकोट येथे जन्मलेल्या धर्मपाल यांनी ही कंपनी सुरु केली. सुरवातीला एका छोट्या टपरीत ‘महाशियान दी हट्टी’ नावाने सुरु झालेल्या या कंपनीचे मसाले अल्पवधीत प्रचंड लोकप्रिय झाले आणि हा मोठा ब्रांड बनला. ३ डिसेंबर २०२० मध्ये धर्मपाल गुलाटी यांचे निधन झाले आहे.