झेलेन्स्की यांचा हिरवा टी शर्ट आणि पुतीन यांचे डिझायनर जॅकेट

रशियाने युक्रेनवर हल्ला चढवून युद्ध सुरु केले त्याला आता २६ दिवस उलटले आहेत. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की जसे लोकप्रिय नेते आहेत तसेच ते उत्तम अभिनेते सुद्धा आहेत. त्यामुळे युद्धाच्या निमित्ताने ते जेव्हा जेव्हा जगासमोर येतात तेव्हा त्यांच्या हावभावातून आणि कपड्यातून एक संदेश दिला जातो असे मानले जाते. युद्ध सुरु झाल्यापासून झेलेन्स्की सतत हिरव्या रंगाच्या टीशर्ट मध्येच दिसले आहेत. याच रंगाच्या टीशर्ट मध्ये त्यांनी अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, जर्मनी, युरोपियन युनियनसमोर भाषण केले आहे.

यातून झेलेन्सी यांनी स्वतःला बंडखोर आणि पोस्टरबॉय म्हणून जगसमोर पेश केल्याचे मानले जात आहे. त्यातून ते जगाची सहानुभूती युक्रेन कडे वळून घेण्यासाठी शर्थ करत आहेत असे प्रतीत होत आहे.

या उलट रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी मास्को मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात १४ हजार डॉलर्स म्हणजे ११ लाख रुपयांचे जॅकेट आणि आंत ४,२१८ डॉलर्सचा म्हणजे साडेतीन लाख रुपयांचा स्वेटर घालून भाषण केले आहे. पुतीन यांच्या पेहेरावावरून सर्व परिस्थिती त्यांच्या नियंत्रणात असल्याचा आणि पुतीन यांचा आत्मविश्वास भरपूर असल्याचा संदेश दिल्याचे मानले जात आहे. युक्रेन आणि पाश्चिमात्य देशांवर आपण हावी आहोत असा संदेश देण्याचा पुतीन यांचा हा प्रयत्न मानला जात आहे.