यंदाच्या आयपीएल मध्ये पुन्हा फिमेल अँकर्स भरणार रंग

आयपीएलच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आली आहे.  भारतीय माजी क्रिकेटरची पत्नी आणि टीव्ही अँकर मधून विशेष लोकप्रियता मिळविलेली मयंती लँगर दोन वर्षाच्या गॅपनंतर पुन्हा एकदा आयपीएल साठी अँकरिंग करणार आहे. आयपीएल मुळातच बड्या बड्या सिताऱ्यानी सजलेली लीग आहे. एक सो एक क्रिकेटर्स आणि सुन्दर अँकर्स मुळेच ही लीग जगभर चर्चेत असते. ही स्पर्धा इतकी लोकप्रिय आणि यशस्वी होण्यामागे ग्लॅमर हेही एक कारण आहेच. फिमेल अँकर्सच्या सहभागामुळे हे ग्लॅमर नक्कीच वाढत आहे.

टीम इंडियाचा माजी अनुभवी खेळाडू स्टुअर्ट बिन्नी यांची मयंती पत्नी आहे. ती दोन वर्षाच्या अंतराने पुन्हा आयपीएल अँकर म्हणून येत असल्याचे तिनेच ट्वीटर वर पोस्ट केले आहे. दोन वर्षापूर्वी मुलाचा जन्म झाल्याने तिने आयपीएल मध्ये सहभाग घेतला नव्हता. मयंतीचे चाहते मोठ्या संखेने आहेत. ती स्टार स्पोर्ट्स ब्रॉडकास्टिंग टीमचा हिस्सा म्हणून आयपीएल मध्ये सहभागी होत आहे.

आयपीएल २०२२ मध्ये संजना गणेशन, तान्या पुरोहित व नेरॉली मिडोज सारख्या अँकर्स यावेळी दिसणार आहेत. मयंती फेमस आयपीएल अँकर्स पैकी एक आहे. स्टूअर्ट बिन्नी सोबत तिची ओळख प्रथम आयपीएल मध्येच २०१२ साली झाली होती. तेव्हा तिने स्टूअर्ट चीच मुलाखत घेतली होती आणि नंतर या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले होते.