पुतीन यांना वाटतेय जीवाची भीती, खासगी स्टाफ बदलला

रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला चढविला आणि जगभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. तशात आता पुतीन यांना स्वतःची हत्या होईल अशी भीती सतावू लागली आहे. आपल्यावर विषप्रयोग होईल या भीतीच्या घेऱ्यात सापडलेल्या पुतीन यांनी त्यांचा खासगी स्टाफ बदलला असून त्यात १ हजार लोक आहेत असे समजते. हेच लोक आपल्याला विष देऊन मारतील अशी पुतीन यांना भीती आहे. डेली बीस्टने या संदर्भात बातमी दिली आहे.

त्यानुसार पुतीन यांनी त्यांच्या तैनातीत असलेला १ हजार लोकांचा स्टाफ बदलला आहे. त्यात बॉडीगार्ड, कुक, कपडे धुणारे व सचिव यांचा समावेश आहे. युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अमेरिकेसह अन्य बडे देश पुतीन यांचा धिक्कार करत आहेत. त्यातही पुतीन यांना रशियात सुद्धा विरोध वाढत आहे. पुतीन यांना ठार करू इच्छिणार्यांची यादी वाढत चालली आहे. त्यामुळे पुतीन यांची भीती अनाठाई नाही असे मानले जात आहे.

रशियात माजी नेत्यांना विषप्रयोग करून ठार करण्याचा इतिहास आहे आणि विशेष म्हणजे पुतीन यांच्यापासूनच तो सुरु झाला आहे. रशियाचे माजी गुप्त हेर व विरोधी नेते आर्लेक लीत्वीन्रेर्को यांना २३ नोव्हेंबर २००६ मध्ये चहातून विष देऊन लंडन मध्ये मारले गेले होते आणि रशियावर या हत्येचा आरोप लावला गेला होता. पुतीन यांचे विरोधक आणि युक्रेनच्या राष्ट्रपती पदाचे उमेदवार व्हिक्टर युश्चेन्को यानाही २००४ मध्ये  विषप्रयोग करून ठार केले गेले होते आणि त्याच वर्षी शोध पत्रकार अॅना पोलीनोंस्कोवा यानाही विष दिले गेले पण त्या त्यातून वाचल्या. अखेर दोन वर्षापूर्वी त्यांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती.

या सर्व विषप्रयोगामागे पुतीन यांचाच हात असल्याचे आरोप दीर्घकाळ होत राहिले आहेत.