रेडमी १० आज भारतात लाँच, फिचर अगोदरच लिक
रेडमी चा रेडमी १० स्मार्टफोन आज भारतात लाँच केला जात असून या फोनची बरीच फीचर्स अगोदरच लिक झाली आहेत. टिप्स्टरकडून शेअर केल्या गेलेल्या माहितीनुसार हे रीब्रांडेड व्हर्जन ६ एमएन स्नॅपड्रॅगन चिपसेट सह येईल. रेडमी नोट ११ प्रो लाँच होतानाच या फोनचे टीझ केले गेले होते आणि नंतर सोशल मिडियावर त्यांची लाँच डेट जाहीर केली गेली. हे डिव्हाईस अल्ट्रा फास्ट स्टोरेजसह येईल असे समजते.
शेअर केलेल्या फोटो मध्ये वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले सह दिसत आहे. फ्लिपकार्ट लाइव झालेल्या मायक्रो साईटवरून हे कन्फर्म झाले आहे कि ई कॉमर्सवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर आणि ड्युअल कॅमेरा आहे. प्रायमरी कॅमेरा ५० एमपीचा असून दुसरा २ एमपीचा सेन्सर आहे. सेल्फीसाठी ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा, ५००० एमएएचची फास्ट चार्जिंग सपोर्ट करणारी बॅटरी, एमआययुआय १३ बेस्ड अँड्राईड ११ ओएस असेल. विविध रॅम व्हेरीयंट मध्ये हा फोन सादर केला जाणार आहे.
नायजेरियात हा फोन नुकताच सादर झाला असला तरी फोनची खरी फीचर्स भारतात तो सादर झाल्यावरच समजू शकतील. ६.५ इंची एचडी डिस्प्ले, आणि ड्युअल सिम सह हा फोन सादर होईल आणि हा बजेट फोन आहे. १० हजार पेक्षा कमी किमतीत तो मिळेल असेही सांगितले जात आहे.