मुख्यमंत्री भगवंत मान यांना मिळणार इतका पगार

पंजाब मध्ये शानदार विजय मिळविल्यानंतर आम आदमी पक्षाचे भगवंत मान यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ काल घेतली आहे. आपने या निवडणुकात ११७ पैकी ९२ जागांवर विजय मिळविला आहे. भगवंत मान हे पंजाबचे १८ वे मुख्यमंत्री बनले आहेत. मुख्यमंत्री पदासाठी त्यांना दरमहा २ लाख ३० हजार वेतन दिले जाणार आहे. त्यात बेसिक पगार आणि मुख्यमंत्री म्हणून दिले जाणारे अन्य भत्ते समाविष्ट आहेत. त्यानुसार विविध सुविधा, सुरक्षा, प्रवास भत्ता, वैद्यकीय सुविधा, निवासस्थान, वीज, फोन बिल यांचा समावेश आहे. शिवाय मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाल पूर्ण केल्यावर त्यांना दरमहा निश्चित पेन्शन दिली जाईल.

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर मान यांनी ज्यां मतदारांनी त्यांना मते दिली नाहीत त्यांचीही काळजी घेणे हे माझे मुख्य काम असल्याचे जाहीर केले आहे. माझे सरकार सर्वांसाठी काम करेल असे त्यांनी सांगितले आहे. मान यांनी त्यांच्या करियरची सुरवात कॉमेडीयन म्हणून केली होती. अनेक पंजाबी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांचा कुल्फी हा अल्बम हिट झाला होता. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ शो मध्ये त्यांच्यातील खरी प्रतिभा समोर आली होती. त्या शो मध्ये ते स्पर्धक होते तर नवज्योतसिंग सिद्धू जज म्हणून काम करत होते. २०११ मध्ये मान यांनी राजकीय पदार्पण केले आहे. २०१४ मध्ये त्यांनी संगसर मधून प्रथम विजय मिळविला होता.

व्यक्तीगत आयुष्यात त्यांना दोन मुले आहेत. त्यांचा विवाह इंदरजित कौर यांच्या बरोबर झाला होता पण त्यांनी घटस्फोट घेतला आहे.