योगी आदित्यनाथ २१ मार्च रोजी घेणार शपथ?

उत्तर प्रदेशात स्पष्ट बहुमत मिळवून पुन्हा सत्तेत येणाऱ्या भाजपचे योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदाची शपथ २१ मार्च रोजी घेण्याची शक्यता असल्याचे समजते. हा शपथविधी संस्मरणीय व्हावा यासाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. गेल्या वेळी योगींनी राजधानीतील रमाबाई आंबेडकर स्मृती उपवनात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती मात्र यावेळी हा कार्यक्रम इकाना स्टेडीयम मध्ये आयोजित केला जाणार आहे.

या कार्यक्रमाला पंतप्रधान मोडी, गृहमंत्री अमित शहा, रक्षा मंत्री राजनाथसिंग, शिवाय अन्य केंद्रीय मंत्री आणि भाजप शासित राज्यातील मुख्यमंत्री तसेच देशातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. यंदा सत्ता वापसीचा आनंद आहे आणि मंत्रिमंडळ बनविताना क्षेत्रीय जातीय समीकरणे लक्षात घेऊन काम सुरु केले गेले आहे असे समजते. अर्थात अंतिम निर्णय पक्ष प्रमुखांशी चर्चा करून घेतला जाणार आहे आणि त्यासाठी योगी आज दिल्लीला रवाना झाले आहेत.

२१ मार्च रोजी पंतप्रधान उपस्थित राहू शकणार नसतील तर शपथविधी पुढे ढकलला जाऊ शकतो असे संकेत दिले गेले आहेत. उत्तरप्रदेशात दर पाच वर्षांनी सरकार बदल अशी परंपरा राहिली आहे ती यावेळी मोडली गेली. शपथ समारंभ हा संकल्प दिवस म्हणून जाहीर झाला असून जनतेशी केलेले वादे पूर्ण करण्याचे पहिले पाउल या दृष्टीने त्याकडे आम्ही पाहतो आहोत असे भाजप मधील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे.