चीची लोलो म्हणजे गोविंदा करिश्माची जोडी पुन्हा एकत्र

बॉलीवूड मध्ये ९० च्या दशकात गाजलेली जोडी होती करिश्मा कपूर आणि गोविंदा यांची. चीची लोलो या नावाने ही जोडी तुफान लोकप्रिय होतीच पण आजही या जोडीचे चाहते मोठ्या प्रमाणांवर आहेत. ही जोडी नंबर वन, दीर्घकाळानंतर पुन्हा एकदा एका प्रोजेक्टसाठी एकत्र येत आहे. विशेष म्हणजे या जोडीचे चित्रपट आजही टीव्हीवर मोठ्या आवडीने पाहिले जातात. पुन्हा एकदा ही जोडी एकत्र दिसणार असल्याने त्यांचे चाहते सुखावले आहेत.

करिष्माने या संदर्भात इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात या जोडीची मस्त केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. एका जाहिराती साठी हे दोघे एकत्र आले आहेत. त्यांच्या चाहत्यांकडून या संदर्भात अनेक प्रतिक्रिया येत आहेत. जगातील बेस्ट जोडी, पुन्हा चित्रपटात या, निदान आयटम सॉंग करा, आजच्या तरुण कलाकारांपेक्षा ही जोडी खास आहे अश्या प्रतिक्रियांचा पाउस पडला आहे. या व्हिडीओला ७८ हजार लाईक मिळाले आहेत.

करिश्मा गोविंदा जोडीने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यात राजाबाबू, साजन चले ससुराल, प्रेमशक्ती, शिकारी, कुली नंबर १, हिरो नंबर १ असे अनेक चित्रपट आहेत. या जोडीने इंडियाज गॉट टॅलेंट शो मध्ये सुद्धा एकत्र काम केले होते.