मॅन ऑफ द सिरीज- ऋषभ पंत, पहिला भारतीय विकेटकीपर

श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या तीन कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी जिंकून टीम इंडियाने ही मालिका २-० ने जिंकली आहेच पण दुसऱ्या कसोटीत शानदार फलंदाजी करणाऱ्या ऋषभ पंत याला ‘मॅन ऑफ द सिरीज’ निवडले गेले असून ही कामगिरी बजावणारा तो पहिला भारतीय विकेटकीपर बनला आहे. याच सामन्यात ऋषभने भारतासाठी सर्वाधिक वेगवान ५० धावा  (२८ चेंडू) काढून नवीन रेकॉर्ड नोंदविले आहे. या कसोटीत ‘मॅन ऑफ द मॅच’ श्रेयस अय्यर ठरला.

टीम इंडियामध्ये आजपर्यंत धोनी, सय्यद किरमाणी, किरण मोरे, राहुल द्रविड अश्या अनेक दिग्गज खेळाडूंनी विकेटकीपर म्हणून उत्तम कामगिरी बजावली आहे आणि त्यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड सुद्धा नोंदली गेली आहेत. पण या पैकी कुणाचीच कधी ‘मॅन ऑफ द सिरीज’ म्हणून निवड झालेली नाही असे दिसते. ऋषभ पंत याला या सिरीज मध्ये आत्तापर्यंत तीन डाव खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने १८५ धावा काढल्या. त्याने १२०.१३ च्या स्ट्राईक रेटने ६१.६७ च्या सरासरीने या धावा काढल्या आहेत.