हे आहेत कच्च्या तेलाचे भांडार असलेले दहा देश
रशिया युक्रेन मधील लढाईची झळ कच्च्या तेलाच्या टंचाई मुळे जगभर पोहोचू लागली आहे. कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे महागाई होऊ लागली आहे आणि त्याचा फटका जगभरातील सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. अमेरिकेपेक्षा जास्त तेल भांडार असणारे सात देश आहेत पण त्यातील काही देश अमेरिकी निर्बंधांमुळे खुल्या बाजारात त्यांचे तेल विकू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. कुठले आहेत हे देश आणि तेथे तेलाचे भाव काय आहेत याची खास माहिती आमच्या वाचकांसाठी
जगात सर्वाधिक तेलभांडार असणाऱ्या देशात एक नंबरवर आहे व्हेनेझुएला. या देशात ३० हजार कोटी बॅरल तेल साठे आहेत. १ बॅरल म्हणजे ४२ गॅलन म्हणजे १५९ लिटर असा हा हिशोब आहे. आज जगात बहुतेक सर्व देशात पेट्रोल डीझेलचे भाव सरासरी ९१ रुपये आहेत मात्र व्हेनेझुएला मध्ये कच्चे तेल २ रुपये लिटरने विकले जाते. व्हेनेझुएला गेले अनेक दिवस राजकीय अस्थिरतेमुळे आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले आहे. अमेरिकेने या देशावर अनेक निर्बंध लावल्याने ते खुल्या बाजारात तेल विकू शकत नाहीत.
या यादीत दोन नंबरवर आहे सौदी अरेबिया. येथे २५८६० कोटी बॅरल तेल साठे आहेत. त्यापाठोपाठ इराण मध्ये २०८६० कोटी बॅरल, इराक १४५०१ कोटी बॅरल, कुवेत १०,१५०, युएई ९७८०, रशिया ८०००, अमेरिका ५२६३, लिबिया ४८३६, नायजेरिया ३६८९ कोटी बॅरल असे हे तेलसाठे आहेत. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराण त्याचे तेल खुल्या बाजारात विकू शकत नाही.
ग्लोबल पेट्रोल प्राईज नुसार व्हेनेझुएला मध्ये तेलाचा भाव २०१८ मध्ये ६८ पैसे प्रतिलिटर झाला होता. सुदान मध्ये पेट्रोल दर प्रती लिटर २३.१२, कुवेत मध्ये २३.८०, इराण मध्ये २४.४८, अल्जिरीया मध्ये २५.१६ रुपये असे आहेत.