वेश्येच्या जागी फोटो, मॉडेलने मागितली २३० कोटींची नुकसान भरपाई

३१ वर्षीय इन्स्टाग्राम इंफ्ल्यूएन्सर इवा लोपेझ हिने न्यूयॉर्क पोलिसांकडून २३० कोटींची नुकसान भरपाई मिळावी म्हणून दावा दाखल केला आहे. डेली मेलने या संदर्भात बातमी दिली आहे. त्यानुसार न्यूयॉर्क पोलीस, एका चोरी करून पळालेल्या वेश्येचा शोध घेत होते. त्यासाठी जागोजागी पोस्टर लावली गेली. मात्र त्यात संबंधित वेश्येच्या फोटो ऐवजी मॉडेल इवा लोपेझ हिचे बोल्ड फोटो लावले गेले. हे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आणि मग इव्हा पर्यंत पोहोचले. तिला हे फोटो पाहिल्यावर जबरदस्त शॉक बसला. तिने त्वरित पोलिसांशी संपर्क साधून पोलिसांकडून झालेली चूक त्यांच्या निदर्शनास आणून दिली.

ऑगस्ट २०२१ मध्ये घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी इवाचे फोटो सोशल मिडिया मधून हटविले पण तरीही पुन्हा पुन्हा हे फोटो व्हायरल होत राहिले. त्यामुळे इव्हाच्या भावना दुखावल्या आणि तिला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. शेवटी तिने तिचे रेप्युटेशन खराब केल्याप्रकरणी न्यूयॉर्क पोलिसांच्या विरोधात नुकसान भरपाईचा २३० कोटींचा दावा लावला आहे. ज्यांनी तिचे नाव खराब केले त्यांनीच त्यांची भरपाई केली पाहिजे असे तिचे म्हणणे आहे.