शाओमी रेडमी १० सी लाँच

हँडसेट निर्माता कंपनी शाओमीचा सबब्रांड रेडमीने ग्राहकांसाठी नवा स्मार्टफोन रेडमी १० सी नावाने बाजारात आणला आहे. या फोन साठी ६.७१ इंची एलसीडी डिस्प्ले दिला गेला आहे. या फोनच्या ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेजची किंमत १४४१८ रुपये असून १२८ जीबी स्टोरेज साठी १६०८१ रुपये मोजावे लागतील असे समजते.

या स्मार्टफोन साठी अँड्राईड ११ वर आधारित एमयुआय १३ ओएस दिली गेली असून स्पीड, मल्टीटास्किंग साठी स्नॅपड्रॅगन ६८० प्रोसेसर आहे. १० डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी ५ हजार एमएएच बॅटरी आहे. बॅक पॅनलवर ५० एमपीचा प्रायमरी कॅमेरा, २ एमपीचे सेकंडरी सेन्सर आणि सेल्फी व्हिडीओ साठी फ्रंटला ५ एमपीचा कॅमेरा दिला गेला आहे. ब्ल्यू, ब्लॅक आणि ग्रीन कलर मध्ये हा फोन उपलब्ध केला गेला आहे.