विजय यात्रेसाठी मोदींनी ‘थार’ ची निवड केल्याने आनंद महिंद्र आनंदले

पाच राज्यांपैकी चार राज्यात निर्विवाद बहुमत मिळवून भाजप सत्तेत परत येत असतानाच पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या मूळ राज्याचा म्हणजे गुजराथचा दोन दिवसांचा दौरा करताना महिंद्र अँड महिंद्रच्या लोकप्रिय ‘थार’ ची निवड केल्याने कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्र अतिशय खुश झाले आहेत. या संदर्भात केलेल्या एका ट्वीट मध्ये ते म्हणतात,’ विजय यात्रेसाठी पंतप्रधानांनी मेड इन इंडिया महिंद्र थारवर विश्वास दाखविला. गुजराथ मधील हा रोड शो व्हिडीओ पाहून खूप आनंद झाला.’

महिन्द्र पुढे लिहितात,’ विजय यात्रेसाठी मेड इन इंडिया वाहनाची निवड केल्याबद्दल धन्यवाद. अश्या यात्रेसाठी मेड इन इंडिया वाहनापेक्षा दुसरे अधिक चांगले काही असून शकत नाही, धन्यवाद पी.एम.’ विशेष म्हणजे महिंद्रा थारच्या किमती नुकत्याच ४५ हजार रुपयांनी वाढविल्या गेल्या आहेत. या एसयूव्हीची किंमत आता १३.१७ लाख वरून १५.५३ लाख (एक शो रूम दिल्ली) झाल्या आहेत. या वाहनाला २ लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि २.२ लिटर डीझेल इंजिन असे दोन पर्याय आहेत. दोन्ही वाहनांना ६ स्पीड ऑटो आणि मॅन्युअल गिअरबॉक्सचा पर्याय सुद्धा दिला गेला आहे. २ ऑक्टोबर २०२० लाँच झालेली ही एसयूव्ही ग्राहकांचा पसंतीस उतरली असून तिच्या साठी मोठी प्रतीक्षा यादी आहे असे समजते.

गुजराथ मध्ये डिसेंबर २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याची तयारी आत्तापासूनच भाजपने सुरु केली आहे. पंतप्रधान मोदी गुजराथ मध्ये खुल्या छताच्या थार एसयूव्ही मधून फिरले आणि हा रोड शो ९ किमीचा होता. हजारोंच्या संखेने लोक मोदीना पाहण्यासाठी रस्त्यावर उभे होते.