युद्धाच्या छायेत रशियात महिला सैनिकांची अनोखी सौंदर्यस्पर्धा

रशिया युक्रेन युद्ध सुरु होऊन १५ दिवस लोटले आहेत. जगभरातून रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लावले गेले आहेत मात्र रशियावर त्याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसून आलेले नाही. युद्धाच्या माहोलात रशियात नुकतीच एक अनोखी महिला सैनिक सौंदर्यस्पर्धा पार पडली. मिररने दिलेल्या बातमीनुसार पुतीन यांची सेना युद्धक्षेत्राकडे रवाना झाली त्यातून ज्या महिला सैनिक परत आल्या त्यांच्यासाठी ही स्पर्धा घेतली गेली. मेकप अंडर कॉमोफ्लेज असे या स्पर्धेचे नाव होते. त्यात रशियाच्या मिसाईल फोर्स मध्ये तैनात असलेल्या महिला सैनिक सहभागी झाल्या होत्या.

सैन्यपत्रिका रेडस्टारमध्ये दिलेल्या माहितीनुसार या स्पर्धेत ४० महिला सैनिक सहभागी झाल्या होत्या. त्यात विविध प्रकारच्या स्पर्धा होत्या. पहिली मेकपची होती. दुसऱ्या स्पर्धेत गॅस व विशेष सूट घालून रासायनिक व जैविक धोका असलेल्या नकली युद्ध क्षेत्रात आगीच्या हल्ल्यातून पार पडायचे होते. अन्य स्पर्धेत अॅसॉल्ट  एकत्र करणे, वेगळ्या करणे, एके ४७ च्या सहाय्याने आग लावणे, हँड ग्रेनेड फेकणे असे विभाग होते. ब्रेन रिंग मध्ये जनरल नॉलेज टेस्ट घेतली गेली. शिवाय कलाकौशल्य, स्वयंपाक असेही विभाग होते. या स्पर्धेत सर्व वयोगटातील महिला सैनिक होत्या.