जगभरात विवो, शाओमी, ओप्पोची मेक इन इंडिया स्मार्टफोन निर्यात
चीनच्या तीन दिग्गज स्मार्टफोन उत्पादक कंपन्या शाओमी, विवो आणि अप्पो मेक इन इंडिया स्मार्टफोनची निर्यात जगभरात करण्याच्या दृष्टीने पावले टाकत आहेत. त्यासाठी भारतातील स्थानिक उत्पादकांशी चर्चा सुरु झाली असून या कंपन्या त्यांची जागतिक निर्यात गरज भारतातून पूर्ण करण्यावर भर देत असल्याचे ब्लुमबर्गच्या रिपोर्ट मध्ये म्हटले गेले आहे.
या रिपोर्ट नुसार जगभर मेक इन इंडिया स्मार्टफोन निर्यात झाले तर त्याचा थेट फायदा भारताला इलेक्ट्रोनिक्स स्मार्टफोन मॅन्यूफॅक्चरिंग हब बनविण्यास मदतगार ठरणार आहे. लावा इंटरनॅशनल व डिक्सन टेक्नोलॉजी इंडिया लिमिटेड या कंपन्यावर या तिन्ही कंपन्या असेम्ब्लिंगची जबाबदारी सोपवीत असल्याचे सांगितले जात आहे. चीन सर्वात मोठा स्मार्टफोन उत्पादक व ग्राहक असला तरी शाओमी, चीन शिवाय दुसरा देश म्हणून भारताचा विचार करत आहे.भारत स्मार्टफोनचा जगातील दुसरा मोठा बाजार आहे म्हणूनच ओप्पो आणि विवो लावा सह चर्चा करत आहेत तर शाओमी डिक्सन बरोबर चर्चा करत आहे.
मोदी सरकारने भारतातून स्मार्टफोन निर्यात वाढावी यासाठी विदेशी मोबाइल उत्पादक कंपन्यांवर लोकल म्हणजे स्थानिक उत्पादनासाठी दबाब टाकला होता. अमेरिका चीन व्यापार युद्धात आणि करोना काळात फोन शिपिंग साठी उशीर होत असल्याचे लक्षात आल्यावर भारताने चीनवरचे अवलंबित्व कमी करण्यावर जोर दिला होता. त्यातून भारताताच उत्पादन केंद्र बनविल्यास विकास जलद होऊ शकेल हा अंदाज बरोबर ठरला आहे. इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रोनिक असोसिएन च्या रिपोर्ट नुसार केंद्राने २०२० मध्ये मोबाईल फोन उत्पादनावर आधारित इंसेन्टीव्ह देणारी योजना (पीएलआय) आणली त्यामुळे निर्यातीत वाढ झाली. या वर्षी मार्च पर्यंत निर्यात ४५० अब्ज रुपयांचा टप्पा ओलांडेल अशी उमेद असून गेल्या पाच वर्षात झालेली ही वाढ पाचपट असल्याचे सांगितले जात आहे.