अमरनाथ यात्रा- यंदा आरएफआयडी टॅग दिले जाणार

हिंदू धर्मीय भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बर्फानी बाबा म्हणजे अमरनाथ यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी एप्रिल पासून सुरु होत असल्याची घोषणा अमरनाथ श्राईन बोर्डाने केली आहे. बँकेच्या माध्यमातून ही नोंदणी करता येणार आहे. या शिवाय यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी सर्व वाहनांची मुव्हमेंट आरएफआयडी आधारित सिस्टीमने ट्रॅक करण्याची सुविधा मिळणार आहे. अमरनाथ श्राईन बोर्डचे अतिरिक्त सीईओ राहुल सिंग यांनी या संदर्भात आगामी यात्रा सुरक्षित आणि सुलभ बनविण्यासाठी नुकतीच उच्चस्तरीय बैठक घेतली गेल्याचे आणि त्यात सर्व व्यवस्थांबाबत चर्चा झाल्याचे सांगितले आहे.

एप्रिल पासून अमरनाथ यात्रेसाठी रोज २० हजार यात्रेकरूंची नोंदणी केली जाणार असून यात्रा काळात निवडक कौंटरवरून ऑनस्पॉट नोंदणी करता येणार आहे. प्रवासी, वाहने मुव्हमेंट साठी रेडीओ फ़्रिक़्वेन्सि आयडेंटीफीकेशनचा उपयोग केला जाणार आहे. त्यासाठी खास टॅग जारी केले जाणार आहेत. प्रवास मार्गावर पुरेशी शौचालये आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात आहे.

कोविड काळात २०२० आणि २०२१ मध्ये प्रतीकात्मक पद्धतीनेच अमरनाथ यात्रा पार पडली होती. त्यावेळी भाविकांना प्रत्यक्ष दर्शन घेता आले नव्हते त्यामुळे यंदा मोठ्या संखेने भाविक येणार हे गृहीत धरून सर्व व्यवस्था केली जात असलायचे राहुल सिंग यांनी सांगितले.