महिलांचा रिअल इस्टेट गुंतवणुकीकडे वाढता कल

महिला आणि गुंतवणूक हा काही वर्षांपूर्वी चेष्टेच विषय मानला जात होता. सोने, लग्झरी फॅशन किंवा बँकेत छोट्या मोठ्या ठेवी इतकीच महिलांची गुंतवणुकीची कल्पना होती त्यात गेल्या काही वर्षात इक्विटी, एसआयपी सारख्या गुंतवणुकीची भर पडली होती. मात्र नुकत्याच केल्या गेलेल्या एक सर्व्हेक्षणात आजकाल महिलांचा कल रिअल इस्टेट गुंतवणुकीकडे वाढला असल्याचे दिसून आले आहे.

ब्रोकरेज मुफ्त रिअल इस्टेट फर्म नोब्रोकर ने हे सर्व्हेक्षण केले. त्यात ६९ टक्के महिलांनी रिअल इस्टेट मध्ये पैसे गुंतविण्यास रुची दाखविली तर २७ टक्के महिलांनी संपत्ती खरेदीत रस दाखविला. ८१ टक्के महिलांनी स्वतःसाठी घर घेण्यास प्राधान्य दिले. ६३ टक्के महिलांनी रेडी टू मूव्ह घरांना पसंती दिली. यात बंगलोरच्या ५६ टक्के महिला आहेत.

विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात संपत्ती खरेदी करणाऱ्या महिलांची संख्या वाढत चालल्याचे दिसले आहे. त्यात गुंतवणूक म्हणून घर खरेदी करण्याची अनेक महिलांची इच्छा आहे. त्यात एनसीआर, दिल्ली आणि बंगलोर मधील महिला अधिक संखेने आहेत. तर स्वतःच्या वापरासाठी घर खरेदीस पसंती देणाऱ्या महिलात मुंबई, चेन्नई, बंगलोर, पुणे, हैद्रवाद या शहरातील महिला अधिक आहेत. हे सर्व्हेक्षण सात शहरात केले गेले आणि त्यात ९ हजार महिलांना सामील करून घेतले गेले होते.