रियलमीचे भारतात दोन नवे स्मार्टफोन लाँच

रिअलमी इंडियाने भारतात दोन नवे स्मार्टफोन रिअलमी ९, फाईव्ह जी आणि रिअलमी एसई अश्या नावांनी सादर केले आहेत. या दोन्ही फोन साठी ४८ एमपीचा प्रायमरी कॅमेरा अन्य दोन कॅमेरयासह दिला गेला आहे. दोन्ही फोन साठी १२८ जीबी स्टोरेज, ५ हजार एमएएचची फास्ट चार्जिंग सपोर्ट करणारी बॅटरी दिली गेली आहे.

रियलमी ९, फाईव्ह जीच्या ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेजची किंमत १४९९९ रुपये तर ६ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेजची किंमत १७४९९ रुपये आहे. आयसीआयसीआय किंवा एसबीआयच्या क्रेडीट कार्ड वरून खरेदी केल्यास १५०० रुपये सूट दिली जाणार आहे. १४ मार्च पासून या फोनची खरेदी फ्लिपकार्टवर करता येणार आहे. या फोनसाठी ६.५ इंची फुल एचडी डिस्प्ले, तीन रिअर कॅमेरे, १६ एमपीचा सेल्फी कॅमेरा, साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

रिअलमी एसई साठी ६.६ इंची फुल एचडी कॅमेरा, ट्रिपल रिअर कॅमेरा सेट, सेल्फीसाठी १६ एमपीचा कॅमेरा, अँड्राईड ११ ओएस, असून हा फोन आयसीआयसीआय अथवा स्टेट बँकेच्या क्रेडीट कार्डवरून खरेदी केल्यास २ हजार रुपये सूट मिळणार आहे. या फोनच्या ६ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेजसाठी १९९९९ तर ८ जीबी मॉडेल साठी २२९९९ रुपये मोजावे लागणार आहेत.