अॅपलने आयफोन एसई २०२० उत्पादन थांबविले

अॅपल ने नवीन वर्षात स्वस्त आयफोन एसई ३ फाईव्ह जी नुकताच लाँच केला आहे आणि त्याचबरोबर लोकप्रिय ठरलेल्या एसई २०२० चे उत्पादन थांबविले असल्याचे जाहीर केले आहे. आयफोन एसई २०२० मॉडेल बंद केल्याने कंपनीने हे मॉडेल कंपनीच्या साईटवरुन हटविले असल्याचे समजते. मात्र अजूनही आयफोन एसई २०२० चे ६४ जीबी स्टोरेजचे मॉडेल फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर हे मॉडेल २९९९९ रुपयात मिळते आहे.

अॅपलने पूर्वीच एसई ३, २०२२ मॉडेल सादर केल्यावर एसई २०२० मॉडेल बंद करण्याचा निर्णय घेतला होता असे सांगितले जात आहे. लेटेस्ट एसई २०२२ मॉडेलला ए १५ बायो चिप सेट सपोर्ट दिला गेला आहे आणि इम्पृव्ह कॅमेरा सेट सुद्धा दिला गेला आहे. एसई २०२० मध्ये ४.७ इंची रेटीना आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला गेला असून रिअर ला सिंगल १२ एमपी कॅमेरा आणि सेल्फी साठी ७ एमपी कॅमेरा दिला गेला होता. हा फोन सिंगल सिमला सपोर्ट करत होता. लाँच झाल्यावर या फोनला तुफान प्रतिसाद मिळाला होता आणि त्याची सुमारे ३ कोटी हून अधिक युनिट विकली गेली असेही सांगितले जात आहे.