रशियात येथे कैद आहेत अमेरिकेचे दोन वैज्ञानिक

रशिया युक्रेन युद्ध आता धोकादायक वळणावर आले असतानाच नासाचे दोन वैज्ञानिक रशियाच्या मास्को मध्ये एका कॅप्सूल मध्ये बंद असल्याची बातमी आली आहे. रशियाने युक्रेन मधील अनेक शहरे मिसाईल डागून कब्जात घेतली आहेत आणि तिसर्या महायुद्धाचा धोका निर्माण झाला आहे. मात्र मास्को मध्ये कॅप्सूल मध्ये बंद असलेल्या अमेरिकेच्या या वैज्ञानिकाना या युद्धाची काही माहिती नसावी असे सांगितले जात आहे.

नासाच्या गेले आठ महिने सुरु असलेल्या एका प्रयोगाचा हे दोन वैज्ञानिक एक भाग आहेत. या स्पेस एक्स्परीमेंट मध्ये सहा लोक सामील आहेत. त्यात अमेरिकेचे दोन, रशियाचे तीन आणि अमिराती मधील एकाचा समावेश आहे. अमेरिकन वैज्ञानिकांची नावे विलीयन क्राऊन आणि एशले किवाल्स्की अशी आहेत. नोव्हेंबर मध्ये या सहा जणांना कॅप्सूल मध्ये बंद केले गेले असून जुलै मध्ये बाहेर काढले जाणार आहे. बाहेरच्या जगाशी या लोकांचा इलेक्ट्रिक लेटर्सच्या माध्यमातून संबंध येऊ शकतो. मिडिया रिपोर्ट नुसार विलियम याने युद्ध सुरु होण्यापूर्वी एका मित्राशी काही चर्चा केली होती पण त्याला युद्धाबद्दल काही माहिती नसावी असे वाटते. नासा हा प्रयोग सुरु ठेवणार कि बंद करणार याचा खुलासा केला गेलेला नाही.