बहुप्रतीक्षित, स्वस्त, आयफोन एसई ३ आला
आयफोन चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. अॅपल इव्हेंट मध्ये दीर्घकाळ प्रतीक्षा असलेला स्वस्त आयफोन सादर करण्यात आला असून आयफोन एसई २०२० चे हे अपग्रेड व्हर्जन आहे. आयफोन एसई ३ नावाने हे फाईव्ह जी सपोर्ट करणारे मॉडेल अॅपलने लाँच केले असून त्याच्या बेसिक मॉडेलची भारतातील किंमत ४३९०० रुपये असेल असे समजते. हा फोन ६४ जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबी व्हेरीयंट मध्ये आला आहे. शुक्रवार मार्च ११ पासून त्याचे प्रीबुकिंग सुरु होत आहे आणि १८ मार्च पासून फोन मिळू शकणार आहेत.
या फोन साठी ए १५ बायोनिक चिपसेटचा वापर केला गेला आहे. या चिपसेटचा वापर आयफोन १३ सिरीजसाठी केला गेला आहे. फोनला ४.७ इंची रेटीना एचडी डिस्प्ले दिला असून आयओएस १५ आहे. फ्रंट आणि बॅक दोन्हीसाठी अतिशय टफ ग्लासचा वापर केला गेला आहे. नवे मॉडेल आयपी ६७ सर्टिफाईड आहे. फोन मध्ये रिअरला १२ एमपीचा कॅमेरा डीप फ्युजन व ६० एफपीएसवर ४ के व स्टील शॉटसाठी स्मार्ट एचडीआर फोर सपोर्टसह दिला गेला आहे. सेल्फीसाठी एचडी कॅमेरा आहे. फोन मध्ये टच आयडी बटण फिंगरप्रिंट फिचर सह दिले गेल्याचे समजते.