झेलेन्स्की यांच्यासाठी बायडेन यांनी पाठविली ही खास वस्तू

रशिया युक्रेन युद्धाचा आज १३ वा दिवस आहे. युक्रेनचे प्रमुख वोलोडीमेर झेलेन्स्की अज्ञात स्थळी लपले असल्याचा दावा रशियाकडून केले जात असताना झेलेन्स्की यांनी आपण राष्ट्रपती भवन सोडून कुठेही गेलेलो नाही असा संदेश दिला आहे. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी झेलेन्स्की यांना एक खास वस्तू पाठविली असल्याचे सांगितले जात आहे. रशियाने केलेल्या दाव्यानुसार झेलेन्स्की यांच्या रक्षणासाठी अमेरिकेचे सील कमांडो आणि ब्रिटनचे एसएएस कमांडो तैनात केले गेले आहेत. मात्र बायडेन यांनी झेलेन्स्की यांना दिलेली वस्तू विशेष खास आहे.

न्यूयॉर्क टाईम्सने या संदर्भात दिलेल्या बातमीनुसार बायडेन यांनी पाठविलेल्या वस्तूमुळे झेलेन्स्की सतत संपर्कात राहू शकणार आहेत आणि अगदी थोड्या वेळच्या सूचनेवरून सुद्धा झेलेन्स्की यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. अमेरिकेच्या नाटो आयटीने अॅसेट लॅपटॉप  झेलेन्स्की यांना पाठविला आहे. यामुळे युक्रेन मधून कोणत्याही वेळी नाटो बरोबर संवाद साधणे त्याना शक्य होणार आहे.

झेलेन्स्की मोबाईल इंक्रीप्ड संचार उपकरण सतत बरोबर बाळगत आहेत. या मोबाईल मुळे ते २४/७ कोणत्याही वेळी बायडेन यांच्याबरोबर चर्चा करू शकतात. शनिवारी झेलेन्स्की यांनी बायडेन यांच्याबरोबर ३५ मिनिटे या फोन वरून चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. युक्रेनला नो फ्लाय झोन जाहीर करावे अशी मागणी झेलेन्स्की यांनी नाटो देशांकडे केली आहे मात्र त्याला अद्यापि मान्यता दिली गेलेली नाही.

रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनला नो फ्लाय झोन जाहीर केल्यास नाटोला सशस्त्र संघर्षात भागीदार मानले जाईल अशी धमकी अगोदरच दिली आहे. दरम्यान झेलेन्स्की यांनी सोमवारी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात,’ आम्ही विसरणार नाही, विसरू देणार नाही, युद्धात अत्याचार केलेल्या सर्वाना शिक्षा मिळेल’ असे सांगितले आहे.