एग्झीट पोल आल्यावर सट्टा बाजारात तेजी
देशातील पाच राज्यात विधानसभेसाठीचे मतदान पूर्ण झाल्यावर निवडणूक निकाल अंदाज येऊ लागले आहेत. जनतेत सर्वाधिक उत्सुकता उत्तर प्रदेश निवडणुकी बद्दल आहे. या पार्श्वभूमीवर सट्टा बाजारात तेजी येऊ लागली असून बहुतेक सटोडिये पहिली पसंती भाजपला देताना दिसत आहेत. त्याखालोखाल समाजवादी पक्षाला पसंती दिली जात आहे. अर्थात कमी पैसे लावून जास्त नफा मिळविण्यासाठी सट्टेबाजाना समाजवादी पक्षावर दाव लावला लागणार आहे. लाखो करोडोंचा सट्टा आत्तापर्यंत लावला गेल्याचेही सांगितले जात आहे.
उत्तर प्रदेशात भाजपला बहुमत आणि एकाच पक्षाचे सरकार यावर सर्वाधिक सट्टा लागला आहे. भाजपचा दर कमी नाही पण दावेदारी मजबूत असल्यामुळे त्यावर फारसा नफा मिळणार नाही. सट्टेबाजारात भाजपाला २२६ ते २२९ जागा दाखविल्या जात असून त्यावर १० हजाराचा सट्टा लावला तर १३ हजार रूपये मिळणार आहेत. समाजवादी पार्टीसाठी १३३ ते १३६ जागा दाखविल्या जात असून येथे मात्र ३२०० रुपये लावले तर १० हजाराची कमाई होणार आहे.
क्रिकेट मध्ये ज्याप्रमाणे जो संघ मजबूत त्यानुसार भाव लागतात तोच प्रकार राजकीय पक्षांबाबत असतो. मायावतींच्या बहुजन पक्षाला ९ ते १० तर कॉंग्रेसला ० ते ३ जागा दाखविल्या जात आहेत मात्र त्यावर सट्टा लावणाऱ्याचे प्रमाण अल्प आहे. सट्टा बाजारात प्रसिद्ध मानल्या जाणाऱ्या फालोडी सट्टाबाजारात उत्तर प्रदेशात योगी सरकार येणार यावर सट्टा भाव फक्त २० पैसे आहे. म्हणजे तुम्ही १ रुपया लावला तर २० पैसे मिळणार आहेत. विशेष म्हणजे मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा निकालासाठी या बाजारात सौदे झालेले नाहीत.