येतेय टाटाची खास एसयूव्ही ब्लॅकबर्ड

टाटा मोटार्सच्या पंच या मायक्रो एसयूवी ने भारतीय बाजारात दबदबा निर्माण केला आहेच पण आता मिडसाईझ एसयूव्ही क्षेत्रात सुद्धा आपली पकड मजबूत करण्यासाठी कंपनी सज्ज झाली आहे. ब्लॅकबर्ड या कोडनेमने टाटा नवीन खास एसयूव्ही २०२३ मध्ये बाजारात उतरविण्याच्या तयारीत असून ही एसयूवी त्यांच्या हॅरियर आणि नेक्सोन या दोन एसयुव्हींच्या मधली जागा भरून काढेल असे सांगितले जात आहे. कुपे स्टाईल ने बनविली जात असलेली ही एसयूव्ही हुंदाईच्या क्रेटाला कडी टक्कर देईल असे मानले जात आहे.

या एसयूवीला १.५ लिटरचे चार सिलिंडर टर्बो इंजिन दिले जाईल आणि ही कार ४.२ मीटर लांबीची असेल असे संकेत दिले गेले आहेत. एसयूव्ही चे इंटिरीअर खास असून इलेक्ट्रिक सनरुफ, १० इंची फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, अॅपल कार प्ले, अँड्राईड ऑटो व मिरर लिंक, वायरलेस चार्जिंग, व्हेंटीलेटेड फ्रंट सीट्स, क्रुझ कंट्रोल, ६ स्पीड ट्रान्समिशन असेल. ही एसयूव्ही पाच सीटर असेल आणि तिला सहा एअरबॅग्ज दिल्या जाणार आहेत. प्रतीलिटर १८ ते २२ किलोमीटरचे अॅव्हरेज असेल आणि बेस व्हेरीयंटची किंमत १० लाख तर टॉप व्हेरीयंटची किंमत १६.५० लाख असेल असेही समजते.