जिनपिंग वापरतात ही तुफान कार, किंमत कोटींच्या घरात

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांच्यामध्ये अनौपचारिक भेट होणार आहे. या दौऱ्यात शी जिनपिंग यांच्या सुरक्षेची देखील विशेष काळजी घेतली जात आहे. जिनपिंग यांच्या ताफ्यात अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांच्याप्रमाणेच आपली स्पेशल कार आहे. जिनपिंग भारतात येण्याआधीच ही कार चीनवरून भारतात आणण्यात आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प हे आपल्या अधिकृत दौऱ्यात कॅडेलिक कार ‘द बिस्ट’चा वापर करतात. या कारची किंमत 15 लाख डॉलर आहे.

(Source)

जिनपिंग यांच्या ताफ्यात ‘होंगकी कार’ आहे. ही लांबलचक, रूंद आणि काळ्या रंगाची कार आहे. या कारच्या खिडकी आणि दरवाजे हे शस्त्रांनी सज्ज आहेत. या कारमध्ये असलेल्या खास सेफ्टी फीचर्सबद्दल कोणालाच माहिती दिली जात नाही. चीनमध्ये होंगकीला ‘रेड फ्लॅग’ म्हणतात. जे कम्युनिस्ट पार्टीचे प्रतिक आहे. या कारला 1958 मध्ये चीनच्या फर्स्ट ऑटो वर्क्स समूहाने लाँच केले होते.

(Source)

चीनच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीने होंगकी एन501 ला खास जिनपिंग यांच्यासाठी बनवले आहे. या कारची सर्वसाधारण किंमत 5.50 कोटी रूपये आहे. मात्र अतिरिक्त सेफ्टी फीचर्समुळे या कारची किंमत अधिक आहे.

(Source)

याआधी शी जिनपिंग आपल्या अधिकृत कारला परदेश दौऱ्यावर नेत नसे. मात्र 2014 ला ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या जी20 परिषदेनंतर जिनपिंग न्यूझीलंडला होंगकी एल5 ही कार घेऊन गेले. आपल्या भाषणामध्ये देखील जिनपिंग चीनच्या नेत्यांना स्वदेशी कार वापरण्यास सांगतात.

(Source)

होंगकी ही एक पॉवरफूल कार आहे. यामध्ये टर्बो चार्ज्ड इंजिन V8 आहे. जे 402 हार्स पॉवर सोबत येते.  सिंगल गॅस टँक फुल असल्यावर ही कार 500 मैल जाऊ शकते. होंगी एल5 चीनमधील सर्वात महागड्या कार पैकी एक आहे. ही कार केवळ 8 सेंकदामध्ये ताशी 100 किमीचा वेग पकडते.

(Source)

सांगण्यात येते की, या खास कारची किंमत 6 कोटी रूपये आहे. कंपनी या कारचे तीन मॉडेल बनवते. एक राष्ट्रपतीसाठी, दुसरे परेडसाठी आणि तिसरे चीनी नागरिकांसाठी बनवले जाते. ही कार दुसऱ्या देशात विकली जात नाही. या कारचे वजन तब्बल 3152 किलोग्राम आहे.

 

Leave a Comment