मेन्स कम्युनिटीमध्ये सध्या शॅकेटचा ट्रेंड


सणासुदीचे दिवस म्हणजे नवीन खरेदीचे दिवस. या खास दिवसांसाठी खास कपडे हवेतच. कपडे खरेदी आणि महिला यांचे कितीही घट्ट नाते असले तरी आजकालची पुरुष जमातसुद्धा यात मागे नाही, मेल कम्युनिटीमध्येही कपड्याच्या दररोज शेकडो नव्या फॅशन येत आहेत आणि त्यातील अनेक लोकप्रिय ठरत आहेत.

बाजारात सध्या जॅकेटच्या लेटेस्ट स्टाईलचे मोठे फॅड दिसून येत असून या नव्या स्टाईलला शॅकेट म्हटले जाते. शॅकेट म्हणजे शर्ट जॅकेट. म्हणजे शर्ट सारखे दिसणारे जॅकेट. विशेष म्हणजे लहान मुलांपासून कोणत्याची वयाच्या पुरुषांना ते शोभते. त्याना लायक्रा, नायलॉन, स्पोर्ट्स वेअर म्हणून विशेष पसंती दिली जात आहे. बोल्ड आणि न्युट्रल असे दोन्ही प्रकारात ते उपलब्ध आहे. हवामानानुसार कोणता प्रकार निवडायचा हे ठरविता येते.


सध्याच्या ट्रेंडमध्ये कोबाल्ट ब्ल्यू, चेरी रेड कलर्स ऑरेंज, ग्रीन, नेव्ही ब्ल्यू सह मिक्स अँड मॅच करून वापरले जात आहेत. खाकी हिरव्या मिलिटरी शॅकेटला ही विशेष पसंती मिळत आहे. ट्रॅकपँट पासून ट्राऊझर किंवा टीशर्ट पासून शर्टवर ते कशावरही शोभून दिसतात.मिलिटरी शॅकेटची रंगसंगती थोडी वेगळी असते त्यामुळे कलर कॉम्बीनेशन करताना थोडी दक्षता घेतली पाहिजे असे फॅशन डिझायनर सांगतात.


हे शॅकेट क्विल्ट प्रकारातही उपलब्ध आहेत. थंडी, थोडा गारवा असेल तर त्याचा वापर सहज करता येतो. कॉलरच्या शर्टवर सुद्धा ते खुलून दिसतात. या प्रकारातील शॅकेटची बटणे उघडी टाका किंवा लावा. तुमचा चॉइस. यात टॅन, चॉकलेट आणि ब्राऊन रंग अधिक लोकप्रिय आहेत.


शॅकेट ऑफिस कॅज्यूअल म्हणूनही वापरता येतात. साधा टीशर्ट, स्किनी फिटेड जीन्स यासोबत ते विशेष खुलून दिसतात. डेनिम जीन्स आणि डेनिम शॅकेट तरुण वर्गात लोकप्रिय आहेत. व्हाईट टी शर्ट, पोलो शर्ट याना विशेष पसंती असून डबल डेनिम लुक म्हणजे डेनिम शर्ट आणि डेनिम शॅकेट आणि जीन्स खास ट्रेंड मध्ये आहेत. मात्र ते घालताना पँट आणि शॅकेटची शेड थोडी वेगळी हवी. म्हणजे डार्क आणि लाईट अशी हवी.

Leave a Comment