जिओच्या देशातील सर्वात मोठ्या कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन

देशातील सर्वात मोठ्या जिओच्या कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन रिलायंस समूहाच्या संचालक आणि रिलायंस फौंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांच्या हस्ते झाले. मुंबईच्या बांद्रा कुर्ला भागात १८.५ एकर परिसरात हे सेंटर उभारले गेले आहे. २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीची बैठक याच सेंटर मध्ये होणार आहे.

या सेंटरचे डिझाईन अतिशय आकर्षक आहे. १,०७,६४०चौरस फुटात बांधलेल्या दोन सेन्टर्समध्ये १०६४० लोक आरामात मावतात. १,६१,४६० चौरसफुट मध्ये तीन हॉल्स असून एकावेळी १६५०० पाहुणे येथे एकत्र कामात सहभागी होऊ शकतात. ३२०० पाहुण्यांसाठी बॉलरूम, २५ मिटिंग रूम्स उपलब्ध आहेत. या सेंटरचे उद्घाटन करताना नीता अंबानी म्हणाल्या, नवीन भारताच्या अपेक्षांचे हे प्रतिबिंब आहे. भारत विकासाच्या कहाणीचा पुढचा अध्याय येथे लिहिला जाईल. मोठी संमेलने, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रीमियम रिटेलिंग, डायनिंग सुविधा असलेले हे पहिलेच कन्व्हेन्शन सेंटर असून ते मुंबई साठी लँडमार्क बनेल.

हे सेंटर म्हणजे जिओ वर्ल्डचा हिस्सा आहे. येथे सांस्कृतिक केंद्र, संगीत कारंजे, रिटेल शॉप्स, कॅफे, रेस्टॉरंट सह सर्व्हिस अपार्टमेंट, ऑफिसेस सुद्धा आहेत.