आणखी एका स्टारकिड ला लाँच करणार करण जोहर

बॉलीवूड मध्ये निर्माता म्हणून प्रसिद्ध असलेला करण जोहर अनेक स्टारकिड्स ना लाँच करण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. दबंग सल्लू भय्याप्रमाणे करण यानेही अनेक स्टारकिड्सना बॉलीवूड डेब्यूची संधी दिली आणि त्यातील काही आज टॉपवर आहेत. याच करणने त्याच्या इन्स्टाग्रामवर आगामी चित्रपटातील कॅरेक्टर्सचे एक पोस्टर शेअर केले आहे. आणि त्यातून तो लवकरच आणखी एका स्टारकिड ला लाँच करत असल्याचे संकेत दिले आहेत.

ही स्टारकिड कपूर खानदानातील आहे आणि अगोदरच ही यंग ब्युटी तिच्या ऑसम फॅशन सेन्स मुळे पॉप्युलर आहे. अनेक बॉलीवूड पार्ट्या मध्ये तिचा ग्लॅमरस लुक चर्चेचा ठरला आहे. या यंग ब्युटीचे नाव आहे शनाया कपूर. जान्हवी कपूर, अर्जुन कपूरची ही चुलत बहिण अभिनेता संजय कपूर यांची मुलगी आहे. बेधडक फोटो शूट साठी ती नेहमीच चर्चेत राहिली असून २२ वर्षीय शनायाचे बिकिनी मधील फोटो शूट खूप व्हायरल झाले होते. करन जोहरच्या ‘बेधडक’ मधून ती बॉलीवूड मध्ये डेब्यू करत आहे.