यामुळे या माशावर लागत आहे लाखोंची बोली

उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यातील कैराना येथे एक मासा लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. लोक हा मासा बघण्यासाठी गर्दी करत आहेत. एवढेच नाही तर हा मासा 5 लाख रूपये देऊन खरेदी करण्यासाठी देखील लोक तयार आहेत. या माशाच्या पोटावर अल्लाह लिहिलेले आहे. त्यामुळेच हा अद्भूत मासा चर्चेचा विषय ठरला आहे.

कैरानामधील मासे पाळण्याचा व्यवसाय करणाऱ्या शबाब अहमदने आपल्या घरातील एक्वेरियममध्ये हा मासा पाळला आहे. त्याने सांगितले की, 8 महिन्यांपुर्वी हा मासा आणला होता. जसजसे हा मासा मोठा होत गेला, तसे त्याच्या पोटावरील पिवळ्या रंगात लिहिलेले अल्लाह हे शब्द दिसायला लागले. त्यांनी सांगितले की, जेव्हा पासून हा मासा घरात आला आहे, कुटुंबाने खूप प्रगती केली आहे.

(Source)

त्याने सांगितले की, हा मासा खरेदी करण्यासाठी लाखोंची बोली लागत आहे. एका व्यक्तीने तर 5 लाख रूपये देण्याची देखील तयारी दर्शवली. मात्र शबाब अहमदने सांगितले की, आम्ही अधिक बोली लागण्याची वाट बघू व त्यानंतरच हा मासा विकू. हा मासा बघायला लोक गर्दी करत आहेत.

Leave a Comment