पाक सीमेवर भारताची हवाई ताकद प्रात्यक्षिके

भारतीय हवाई दलाची १४८ विमाने पाकिस्तान सीमेवर मोठा सराव करत असून ७ मार्च रोजी हा मोठा युद्धसराव म्हणजे ‘वायुशक्ती २०२२ ‘ साजरा केला जात आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. या प्रात्यक्षिकात यंदा प्रथम राफेल लढाऊ विमाने सामील होत आहेत. जेसलमेरच्या पोखरण रेंज मध्ये ही प्रात्याक्षिके होत आहेत.

दर तीन वर्षांनी हवाई दल आपली सज्जता दाखविण्यासाठी वायुशक्ती हा युध्द सराव करत असते. यापूर्वी २०१९ मध्ये असा सराव केला गेला होता. या वर्षी १४८ विमाने यात सहभागी होत आहेत. त्यात १०९ लढाऊ विमाने आहेत. यात राफेल, जग्वार, सुखोई ३०, मिग २९, तेजस यांची मर्दुमकी दाखविणार आहेत. त्याचबरोबर २४ हेलीकॉप्टर आणि अन्य विमाने सुद्धा प्रात्याक्षिके दाखविणार आहेत. कार्यक्रमाची सुरवात १७ जग्वार विमाने करणार आहेत. सकाळी साडे दहा ते साडेबारा या वेळेत होत असलेल्या प्रात्यक्षिकात आकाश मिसाईल, स्पायडर मिसाईल प्रणाली क्षमतेचे दर्शन होणार आहे.

या प्रचंड मोठ्या आकाराची सी १७ आणि सी १३० जे ही वाहतूक विमाने सुद्धा दर्शन देणार आहेत.