सोशल मिडीयावर पुतीन यांची ‘सिक्रेट डॉटर’ चर्चेत
रशिया युक्रेन मधील युद्धाचा आठवा दिवस सुरु होत असताना युद्धाबरोबर युद्धाशी संबंधित लोकांच्या विषयीची बरीच माहिती सोशल मिडियावर व्हायरल होत असून त्यात पुतीन आघाडीवर आहेत. पुतीन यांच्याविषयी सर्वाधिक सर्च सध्या केला जात आहे आणि तंतोतंत पुतीन यांच्या सारख्या दिसणाऱ्या एका १८ वर्षाच्या युवतीचा फोटो सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल होतो आहे. जगासाठी हा चेहरा नवा असला तर रशियन मिडियासाठी तो नवा नाही. लुईज रोजोवा नावाची ही तरुणी पुतीन यांच्या सेंट पिटस्बर्ग गावाची राहणारी आहेच पण ती पुतीन यांची ‘सिक्रेट डॉटर’ म्हणून ओळखली जाते.
पुतीन यांची अनौरस मुलगी अशी ओळख मिळाल्याचा लुईझ हिच्या आयुष्यावर मोठा प्रभाव पडला असून शक्यतोवर ती सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळते असे सांगितले जाते. साधी सफाईकामगार ते कोट्याधीश उद्योजक अशी प्रगती केलेल्या स्वेतलाना क्रिवोनोगीख या महिलेची ही मुलगी आहे. तिची ओळख पुतीन यांची गर्लफ्रेंड अशीच आहे. ४५ वर्षीय स्वेतलाना रशियन बँकेची भागीदार आहे. तिच्याकडे ३.१ दशलक्ष पौंड किमतीची एका शानदार हवेली असून या दोघी मायलेकी अलिशान आयुष जगत आहेत.
अर्थात पुतीन किंवा स्वेतलाना यांनी त्यांच्यावर होत असलेल्या प्रेमप्रकरण चर्चेवर कधीच उत्तर दिलेले नाही. मात्र स्वेतलाना हिने एका ठिकाणी बोलताना लुईज तरुणपणीच्या पुतीन सारखी दिसते हे मान्य केले आहे. लुईझ इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध असून तिचे ८४ हजार फॉलोअर्स आहेत. युक्रेनवर रशियाने हल्ला केल्याने अनेकांनी लुईझवर टीका केली आहे तर अनेकांनी यात तिचा काही दोष नाही अशी सहानभूती दाखविली आहे. लुइझाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ती नेहमीप्रमाणे सोशल मिडीयावर सक्रीय आहे.