ब्रिटन ठरतेय एलियन्सचे आवडते ठिकाण !

पृथ्वीबाहेर सुद्धा जग असावे या समजुतीने कित्येक वर्षे खगोल संशोधक सातत्याने संशोधन करत आहेत. परग्रहवासी, त्यांच्या उडत्या तबकड्या यांच्या कथा यामुळेच सातत्याने समोर येत राहतात. अमेरिकेत अनेकदा अश्या उडत्या तबकड्या दिसल्याचे दावे केले जात असले तरी गेल्या वर्षात म्हणजे २०२१ मध्ये ब्रिटन मध्ये सर्वाधिक उडत्या तबकड्या दिसल्या असल्याचे समोर आले आहे. यामुळे आधुनिक युफोलॉजीच्या इतिहासात हे वर्ष महत्वपूर्ण मानले जात आहे.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार गतवर्षात सुमारे ४१३ वेळा ब्रिटन मध्ये उडत्या तबकड्या दिसल्या असून त्या सर्वाधिक प्रमाणात नॉर्थवेस्ट किंवा यार्कशायर भागात आणि त्याही शनिवारी दिसल्या आहेत. रात्री ९ ते १० या वेळात अनेकदा अश्या तबकड्या पहिल्या गेल्याचे दावे त्या त्या भागातील नागरिकांनी केले आहेत. एक घटनेत तर चार ठिकाणी त्रिकोणी आकाराच्या तबकड्या चार शहरात १८ तासात दिसल्या आणि विविध ठिकाणी लोकांनी त्या पहिल्या. ब्रिटीश सरकारने सुद्ध्या अमेरिकेप्रमाणे हा प्रकार गंभीरपणे घेतला असून सैन्य ठिकाणांजवळ अश्या तबकड्या वारंवार दिसत असल्याचे नमूद केले आहे. अनेक तज्ञांनी हा मामला ब्रिटन सुरक्षेशी जोडला असल्याचे सांगितले जात आहे.