पुतीन यांच्या बदललेल्या लुक मागचे हे आहे रहस्य

रशिया युक्रेन मधील युद्ध आता गंभीर स्वरूप धारण करत असून युक्रेनवर रशियन सैन्य भीषण हल्ले करत आहे. या काळात रशियचे अध्यक्ष पुतीन जगभरात सर्वाधिक चर्चेत असलेली व्यक्ती बनले आहेत आणि त्याच्या विषयी अनेक बातम्या बाहेर येत आहेत. ६९ वर्षाचे पुतीन नेहमीच त्यांच्या फिटनेस बद्दल चर्चेत राहिलेले आहेत. मात्र पुतीन यांच्या बदललेल्या चेहऱ्यामागचा गौप्यस्फोट ब्रिटनचे माजी विदेश मंत्री लॉर्ड ओवेन यांनी नुकताच केला आहे.

लॉर्ड ओवेन हे स्वतः डॉक्टर आहेत. एका रेडीओ चॅनलवर बोलताना ते म्हणाले,’ पुतीन यांचा चेहरा पूर्ण बदलला आहे. आता तो ओव्हलशेप दिसतो. पुतीन यांनी प्लास्टिक सर्जरी केली आहे, ते बोटोक इंजेक्शन घेतात असे अनेक दावे केले जात असले तरी मी त्याच्याशी सहमत नाही. पुतीन तरुण दिसण्यासाठी अॅनाबोलिक स्टीरॉईडस किंवा कोर्टीको स्टेरोईड चा वापर करत असावेत. त्या स्टेरोईड मुळेच चेहऱ्यात असा बदल होतो.

डॉ. ओवेन यांच्या मते जी व्यक्ती ही स्टेरोईड घेते ती आक्रमक बनते, त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि त्यांना करोना संसर्गाचा धोका वाढतो. याच कारणामुळे पुतीन यांनी स्वतःला आयसोलेट केले आहे आणि ते कुणाचीही भेट घेत नाहीत. ६९ वर्षीय पुतीन ज्युडो, बॉक्सिंग, घोडदौड, हॉकी, फुटबॉल मध्ये निष्णात आहेत.