टायगर झाला ३२ वर्षाचा

बुधवारी, २ मार्चला बॉलीवूड मध्ये आपल्या अभिनय, अॅक्शन आणि लुक्स मुळे अल्पावधीत लोकप्रिय ठरलेला टायगर श्रॉफ ३२ वर्षे पूर्ण करत आहे. मुळातच वेगळ्या नावामुळे लक्षात राहणाऱ्या टायगरचे खरे नाव टायगर नाही. २ मार्च १९९० ला जन्मलेल्या या बाळाचे नाव जॅकी आणि आयेशा यांनी जय हेमंत असे ठेवले होते. पण चित्रपटात डेब्यू करताना टायगर नावाने त्याला लाँच केले गेले.

एका मुलाखतीत टायगरने या नावामागचे रहस्य स्वतः सांगितले होते. तो म्हणाला होता, ‘ लहानपणी मी सतत सगळ्यांना चावायचो. त्यातून माझी स्कूल टीचर सुद्धा सुटली नाही. त्यासाठी मला शिक्षा भोगावी लागली. त्यातून या नावाची कल्पना आली. टायगर हे नाव वेगळे आहे आणि त्या प्राण्याशी साम्य दाखविणारे आहे.’ टायगरला सोशल मिडीयावर वाढदिवसाच्या शुभेच्छा मोठ्या प्रमाणावर दिल्या जात आहेत.

टायगर सुरवातीला जेव्हा चित्रपटात आला तेव्हा त्याच्या दिसण्यावरून त्याला खूप ट्रोल केले गेले होते. पण आता मात्र बडे बडे निर्माते त्यांच्या चित्रपटात काम करावे म्हणून त्याच्या मागे मागे धावत आहेत. टायगरचे स्टंट त्याच्या चाहत्यांना मनापासून भावत आहेत. टायगरच्या हिरोपंती दोन, गणपत, बडे मिया छोटे मिया अश्या एकसो एक फिल्म लवकरच रिलीज होत आहेत.