शिवभक्त आहे विराट कोहली

टीम इंडियाचा माजी कप्तान विराट कोहलीचे टॅटू प्रेम आता नवे राहिलेले नाही. त्याच्या या टॅटू वेडामुळेच त्याच्या शरीरावर ११ टॅटू आहेत असे सांगितले जाते. तुफानी फलंदाजी करणारा हा खेळाडू सच्चा शिवभक्त आहे हे अनेकांना माहिती नसेल. आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने विराटच्या शिव भक्तीचा पुरावा खास आमच्या वाचकांसाठी देत आहोत.

विराटच्या मनात देवांचे देव महादेव यांच्यासाठी विशेष स्थान आहे. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हापासून त्याला टॅटू गोंदवून घेण्याचा छंद आहे. त्याच्या शरीरावर असलेल्या ११ टॅटूपैकी प्रत्येकाचे कारण आणि महत्व वेगळे आहे. पण त्यातील तीन टॅटू असे आहेत ज्यावरून विराट शिवभक्त असल्याचे साक्ष देता येते.

विराटच्या डाव्या खांद्यावर भोलेनाथाच्या तिसरा डोळा दर्शविणारा टॅटू आहे. हा टॅटू विराटसाठी सर्वात खास आहे असे तो एका मुलाखतीत बोलला आहे. तो म्हणतो हा टॅटू माझ्या हृदयात खास स्थान असलेला आहे. या टॅटू शेजारीच ओम अक्षर कोरलेला टॅटू आहे. ओंकार हा शिवाशी संबधित अनाहत नाद मानला जातो. ब्रह्मांडामध्ये हा नाद नेहमी गुंजत असतो आणि तो ऐकण्यासाठी निर्मल मन आणि ध्यान जरुरी असते.

विराटच्या डाव्या हातावर ध्यानात लीन झालेल्या शिव प्रतिमेचा टॅटू आहे. पौराणिक कथेनुसार कैलास पर्वतावर शिव ध्यानधारणा करतात. त्याचीच प्रतिमा विराटच्या हातावर गोंदली आहे.