युक्रेनची ब्युटीक्वीन देशरक्षणासाठी उतरली  युद्धात

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध दिवसेनदिवस अधिक तीव्र होत चालले असतानाचा युक्रेन मधील अनेक नागरिक देशरक्षणासाठी हातात शस्त्रे घेऊन युद्धात उतरले आहेत. त्यात पुरुष आहेत, महिला आहेत तसेच सेलेब्रिटी आणि बड्या व्यक्ती सुद्धा आहेत. मिस युक्रेन अनास्तासिया लेना ही रूपसुंदरी सुद्धा त्यात सामील झाली असून देशासाठी तिने हाती बंदूक घेतली आहे. तिचे बंदूक हाती घेतलेले फोटो तिने शेअर केले आहेत.

आपल्या फोटो खाली ही सुंदरी लिहिते,’ रशियाच्या हल्ल्याविरुद्ध देश रक्षणासाठी सेनेत सामील झाले आहे. आमच्या भागावर कब्जा करायचा म्हणून जो कुणी युक्रेनच्या सीमेच्या आत घुसेल, मारला जाईल.’ तिने युक्रेनच्या अन्य सैनिकांसह राष्ट्रपती जेलेन्स्की यांचा फोटो शेअर केला आहे आणि त्यांचा उल्लेख खरा आणि मजबूत नेता असा केला आहे.

अनास्तासिया २०१५ मध्ये मिस ग्रँड इंटरनॅशनल ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये युक्रेनची प्रतिनिधी म्हणून उतरली होती. तिचे इन्स्टाग्रामवर ७५ हजार फॉलोअर्स आहेत.