या आहेत जगातील पाच बड्या मिलिटरी

रशिया युक्रेन लढाई मुळे जगातील अन्य देश सावध झाले आहेत. तिसरे महायुद्ध तोंडावर असताना युक्रेन मध्ये सध्या सर्वाधिक सेनाभरती सुरु आहे. तसेच तिसरे महायुद्ध झालेच तर कोणता देश ताकदीने उभा राहू शकतो यांची चर्चा सुद्धा रंगत आहे. या संदर्भात ग्लोबल फायरपॉवर लिस्ट प्रसिद्ध झाली असून त्यात जगातील बड्या देशांचे तुलनात्मक अध्ययन केले गेले आहे. ही यादी तयार करताना ५० विविध बाबींचा विचार करून कोणता देश अधिक सज्ज यांचे अनुमान काढले गेले आहे.

यानुसार जगातील पाच बड्या मिलिटरी असलेल्या देशांची यादी जाहीर केली गेली आहे. अपेक्षेप्रमाणे अमेरिका यात नंबर वनवर आहे. त्यांच्याकडे १४ लाख सक्रिय सैन्य आहे. गतवर्षी अमेरिकेचे सुरक्षा बजेट ७०० अब्ज डॉलर्सचे होते. दोन नंबरवर या यादीत रशिया आहे. रशियाचे सुरक्षा बजेट ४६ अब्ज डॉलर्स असून त्यांच्याकडे ८ लाख ५० हजार सैन्य आहे. ७७२ लढाऊ विमाने आणि ४१०० हून अधिक अन्य विमाने रशियाकडे आहेत.

या यादीत तीन नंबरवर चीन आहे. चीनचे संरक्षण बजेट २०९ अब्ज डॉलर्स आहे आणि त्यांच्याकडे २० लाख सक्रीय सैन्य आहे. चीन हा एकमेव देश आहे जेथे सैनिकांकाडून सर्वाधिक कामे करून घेतली जातात. या यादीत भारत चार नंबरवर आहे. भारताकडे १४ लाख सक्रीय सैनिक आहेत. काही बाबतीत भारताने चीनला मागे टाकले आहे. जगातील सर्वात पॉवरफुल पॅरामिलिटरी फोर्स भारताकडे आहे. भारताचे संरक्षण बजेट ५.२५ लाख कोटी आहे. जपान या यादीत पाच नंबरवर आहे. त्यांच्याकडे २ लाख सक्रीय सैन्य आहे. पण जपान शांतीप्रिय देश आहे. अमेरिकेने अणुबॉम्ब टाकल्यावर झालेल्या विनाशाचे परिणाम जपान अजून भोगत आहे. यामुळे कोणतेही प्रश्न संवादाने सोडवावे असा जपानचा प्रयत्न असतो.